शब्दांचे अर्थ मराठी मध्ये जाणून घ्या

Anxiety म्हणजे काय ? Anxiety Meaning in Marathi

Anxiety meaning marathi article feature image
Table of Contents

मित्रांनो तुमच्या जीवनात कधीतरी अशी परिस्थिती निर्माण झाली असेच ज्यामुळे तुम्हाला खूप चिंता वाटली आणि भयभीत झालात. तर मित्रांनो हे कदाचित तुम्हाला अती सामान्य वाटत असेल परंतु हे सामान्य नसून एक मानसिक आजार आहे आणि याला anxiety असे म्हणतात. आजच्या anxiety meaning in marathi या लेखात आम्ही तुमच्यासाठी याच anxiety आजाराबद्दल संपूर्ण मराठी माहिती सांगणार आहोत. ही माहिती वाचून तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. तरी कृपया प्रस्तुत माहिती अगदी शेवटपर्यंत वाचा ही नम्र विनंती आहे.

Anxiety Meaning in Marathi – मराठी मध्ये Anxiety चा अर्थ

 आयुष्य म्हटलं तर थोडं फार प्रमाणात भीती चिंता हे असतेच असते. मग तो कुणीही असो, प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्या फार प्रमाणात भीती चिंता असतातच परंतु या चिंतेच्या आणि भीतीच्या वातरणात राहून आपल्यासोबत काहीतरी वाईट होण्याची भीती किंवा चिंता वाटल्याचे संतेक मिळणे म्हणजेच हा anxiety चाच एक प्रकार आहे. अर्थात ज्या चिंता अस्तित्वावतच नसतात त्या चिंता आपल्याला आहेत असा भास होणे म्हणजे त्यालाच anxiety असे म्हणतात. जो एक प्रकारचा मानसिक आजार आहे.  वास्तविक पाहता आपण विचार केला तर भीती वाटणे,चिंता करणे या सर्व गोष्टी अती सामान्य आहेत परंतु ज्या चिंता आणि भीती मुळात अस्तित्वातच नाहीत अशा चिंता करणे आणि भीती वाटणे यामुळे आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि आर्थिक जीवनावर सुद्धा परिणामकारक ठरू शकतात. आणि यामुळे anxiety सारखा मानसिक आजार आपल्याला जळतो. 

तुम्हाला जर अशेच दैनंदीन जीवना मधले English शब्दांचा अर्थ आणी त्याच्या बद्दल संपूर्ण माहीती, आपलं English पक्क करण्यासाठी आणी शब्दांबद्दल माहिती भेटण्यासाठी पाहिजेल असेल तर तुम्ही इथे “दैनंदीन शब्द” क्लीक करू शकतात

Reasons Of anxiety in marathi – anxiety ची कारणे 

       आता मित्रांनो तुम्हाला anxiety हा कशा पद्धतीचा मानसिक आजार आहे हे तुम्हाला वरील माहिती वरुन समजलेच आहे. तर आता आपण ह्या मानसिक आजार होण्यामागील मुख्य कारणे कोणती आहेत ते आपण सविस्तरपणे बघुया.

  • भूतकाळातील त्रासदायक घटना आणि दुःखद आठवणी 

आपल्या जीवनात भूतकाळ काही अशा घटना घडत असतात ज्या फार त्रासदायक आणि दुःखद असतात आणि अशा दुःखद आठवणी सहजासहजी मिटल्या जात नाही आणि अशा आठवणी वर्षानुवर्षे मनात घर करून बसतात. कालांतराने काही लोकं अशा घटनांना आणि दुःखद आठवणींना एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जातात मात्र काही लोकं कितीही प्रयत्न करून अशा घटनांना आणि दुःखद आठवणींना विसरू शकत नाही आणि वर्षानुवर्षे त्या आठवणींना मनातल्या मनात कोंडून ठेवतात आणि त्यामुळे त्यांना हा anxiety आजार होण्याची शक्यता असते.

  • ताण 

अनेक लोकांना त्यांच्या वयक्तिक जीवनात अनेक प्रकारचे ताण असतात उदाहरणार्थ बघितलं तर घरच्या परिस्थितीचा ताण, आर्थिक अडचणींचा ताण, तरुणांना त्यांचे करियर घडविण्याचा ताण यामुळे देखील anxiety आजार होण्याची शक्यता असते.

 

  • नैराश्य

 काही लोकांच्या वाट्याला सतत अपयश येत असतं त्यामुळे काही लोकं हे सहन करू शकत नाही आणि त्यांच्या आत्मविश्वास ढासळत जातो त्यामुळे नैराश्य येत असते. हे कारण देखील anxiety या आजारासाठी कारणीभूत ठरू शकते.

  • आत्मसन्मानाची पायमल्ली 

आपल्या आयुष्यात कधी ना कधी एक असा प्रसंग येतच असतो ज्यामुळे आपल्या आत्मसन्मानाची पायमल्ली होत असते. यामुळे काही लोकांना खूप मोठ्ठा धक्का बसतो त्यामुळे सुद्धा त्यांना anxiety सारखा आजार होण्याची शक्यता असते. 

Symptoms of anxiety – anxiety ची लक्षणे

          कुणाला anxiety हा आजार झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी या आजाराचे काही लक्षणे आहेत ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया

  • नेहमी चिंताग्रस्त राहणे 

एखादा व्यक्ती सतत लहान लहान गोष्टींपासून चिंतेत राहत असेल तर त्नेहमी चिंतेत राहणे हा anxiety या आजाराचा पहिला लक्षण आहे. 

  • एकाग्रतेची कमतरता जाणवणे 

anxiety चे दुसरे लक्षण म्हणजे एकाग्रतेची कमतरता जाणवणे आहे. एखादया व्यक्तीचं जर कुठल्या कामात बरोबर लक्ष लागत नसेल मग ते कुठलंही काम असो, पुस्तक वाचन करणे, लिहिणे, घरातील कामे, ऑफिस मधील कामे, अभ्यास करणे अशा अनेक कामांमध्ये एखाद्या व्यक्तीचे लक्ष लागत नसेल तर हे देखील anxiety चे लक्षण आहे.

  • भीती वाटणे किंवा अस्वस्थ वाटणे 

काही लोकांना सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दल भीती वाटत असते. कित्येकदा अशा गोष्टींबद्दल भीती वाटते की ज्या गोष्टी अस्तित्वातच नाही किंवा कित्येकदा कधी कधी त्यांना अस्वस्थ वाटल्यासारखं जाणवत असते. हे सुद्धा एक प्रकारचे anxiety या आजाराचे लक्षण आहेत.

  • सतत नकारात्मक विचार मनात येत राहणे 

 काही माणसे सतत कुठल्याही गोष्टींबद्दल नकारात्मक विचार करत बसतात. कुठलेही काम करायचे असल्यास सर्वप्रथम “हे नाहीच होणार” असे म्हणत राहतात. हे देखील anxiety या आजाराचे लक्षण आहेत.

  वरील सर्व लक्षण ज्या व्यक्तीच्या वागण्यात आपल्या आढळले त्यांना समजून जायचं की anxiety या मानसिक आजाराने ग्रासलेले आहेत.

Remidies on Anxiety Disorder – Anxiety या आजारावर उपचार 

आम्ही तुमच्या साठी याच लेखात Anxiety या आजारावर उपचार सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्हाला दुसरीकडे जायची गरज पडणार नाही.

  • सायकोथेरपीचा वापर करणे 

 Anxiety या आजाराला टाळायचं असेल तर सर्वप्रथम मनावर नियंत्रण करणे महत्वाचे असते त्यासाठी सायकोथेरपीचा ही पद्धत फायदेशीर ठरते. या पद्धतीचा वापर करून रुग्णाच्या मनावर नियंत्रण मिळविण्यास मदत होते आणि त्यामुळे Anxiety हा आजार बरा होतो.

  • अशा रुग्णांना कधीच एकटे सोडता कामा नये 

तुमच्या जवळच्या किंवा तुमच्या परिवारातील कुणी Anxiety या आजाराने त्रस्त असतील तर त्यांना एकटे सोडू नका तर त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा कारण असे व्यक्ती कधीही स्वतःचा बरा वाईट करू शकतात त्यामुळे त्यांना एकटे सोडू नका.

  • शरीरास पोषक असणारा आहार नियमित घेणे 

आहारामुळे सुद्धा कित्येकदा मानसिक असो वा शारीरिक हानी होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे अशा रुग्णांना बाहेरचे आणि उघड्यावरचे तसेच शरीराला जड असलेले आहार न देता स्वस्थ किंवा पोषक आहार द्यावे. त्यांना ताजा भाजीपाला, फळे यांचा सेवन भरपूर प्रमाणात द्यावे आणि त्यांना वेळेवर जेवण द्यावे.

  • जेवणाची एक निश्चित वेळ असावी. 

आपण आपला दैनंदिन आहार कधीही आणि केव्हाही घेत असतो आणि याचा फार वाईट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होत असतो त्यामुळे जेवणाची एक निश्चित वेळ ठरवायची आणि त्याच वेळेवर जेवण करावे. 

  • सुमधुर गाणी ऐकावे 

Anxiety हा आजार तणाव वाढल्यामुळे सुद्धा होत असतो त्यामुळे अशा रुग्णांना सुमधुर गाणी ऐकायला हवी कारण सुमधुर गाणी ऐकल्यास तणाव दूर होत असतो. त्यांनी गाणी ऐकले की त्यांचं मन प्रसन्न आणि शांत होईल ज्यामुळे त्यांचा तणाव नाहीसा होईल आणि Anxiety या मानसिक आजारापासून ते मुक्त होतील.

  • नियमित व्यायाम करावे 

रोज 15 ते 20 मिनट व्यायाम केल्यास फक्त शारीरिक आरोग्य च नाही तर मानसिक आरोग्य देखील सुदृढ राहते त्यामुळे अशा रुग्णांना नियमित कमीत कमी 15 ते 20 मिनटे व्यायाम करावयास सांगावे. आणि सोबतच रोज 5 मिनटे ध्यान करावयास देखील सांगावे ज्यामुळे मन शांत होत असते आणि एकाग्रतेत वृद्धी होते.

Anxiety चा English वाक्या मध्ये वापर

खाली आपण कांही इंग्लिश वाक्य दिले आहे आणी त्याचा अर्थ मराठी मध्ये दिला आहे म्हणजे तुम्हाला तो शब्द इंग्लिश मध्ये कसा वापरात ते समजेल

1.Sentence: “The upcoming exam filled her with anxiety.”

Marathi: येणार्‍या परीक्षेने तिला चिंताग्रस्त केले.

2.Sentence: “He felt a growing anxiety about his job security.”

Marathi: त्याला आपल्या नोकरीच्या सुरक्षेबद्दल वाढती काळजी वाटत होती.

3. Sentence: “The loud noises gave the baby severe anxiety.”

Marathi: मोठ्या आवाजांमुळे बाळाला प्रचंड विवंचना निर्माण झाली.

4. Sentence: “She tried to control her anxiety by taking deep breaths.”

Marathi: खोल श्वास घेऊन तिने आपली चिंता नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला.

5. Sentence: “He was full of anxiety before his date.”

Marathi: त्याच्या डेटपूर्वी तो घोर फिकिरीत होता.

6.Sentence: “The doctor diagnosed her with anxiety disorder.”

Marathi: डॉक्टरांनी तिच्यावर चिंताग्रस्त विकार असल्याचे निदान केले.

7. Sentence: “Traveling alone filled him with a sense of anxiety.”

Marathi: एकट्याने प्रवास करणे त्याला हुरहुर लावून गेले.

8. Sentence: “She confided in her friend about her anxiety problems.”

Marathi: तिने आपल्या चिंताग्रस्त समस्यांबद्दल आपल्या मित्राला विश्वासात घेतले.

9. Sentence: “Meditation helped him to overcome his anxiety.”

Marathi: ध्यानधारणेमुळे त्याला आपल्या चिंतेवर मात करण्यास मदत झाली.

10. Sentence: “There’s no need to feel anxiety, everything will be fine.”

Marathi: चिंता करण्याची गरज नाही, सर्व ठीक होईल.

Conclusion

                  तर मित्रांनो आम्ही तुमच्या साठी anxiety meaning in marathi या article च्या माध्यमातून Anxiety या मानसिक आजाराबद्दल माहिती मराठी मध्ये सांगितलेली आहे त्यासोबतच Anxiety या आजाराची कारणे, लक्षणे आणि सोबतच त्यावर उपचार आणि उपाय सुद्धा सुचविलेले आहेत त्यामुळे तुम्हाला दुसरीकडे जायची गरज भासणार नाही. तर प्रस्तुत article वाचून तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला comment box मध्ये नक्कीच कळवा आणि तुमच्या जवळच्या किंवा परिवारातील वरील लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यापर्यंत ही माहिती share करायला विसरू नका.

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

ज्या चिंता अस्तित्वावतच नसतात त्या चिंता आपल्याला आहेत असा भास होणे म्हणजे त्यालाच anxiety असे म्हणतात. जो एक प्रकारचा मानसिक आजार आहे.

भूतकाळातील त्रासदायक घटना किंवा दुःखद आठवणी, ताण, नैराश्य आणि आत्मसन्मानाची पायम्मली होणे हे मुख्य Anxiety होण्याची मुख्य करणे आहेत.

नेहमी नकारात्मक विचार करत राहणे, सतत चिंता करत राहणे, कुठल्याही कामात लक्ष न लागणे, भीती वाटणे किंवा अस्वस्थ वाटणे ही Anxiety ची मुख्य लक्षणे आहेत.

 Anxiety हा मानसिक आजार जळल्यास गाणी ऐकणे, रोज नियमितपणे व्यायाम करणे,योग्य आहार खाणे, सायकोथेरपी तसेच जेवणाची एक निश्चित वेळ ठरविणे असे उपाय केल्यास Anxiety बरा होतो.

©2023 Marathi Meaning