इंग्रजीमध्ये, “How about you?” हा वाक्यांश आपल्याबरोबर बोलणाऱ्या व्यक्तीकडे चौकशी दर्शवतो आणि त्यांनाही बोलण्याची संधी देतो. तो एखाद्या गोष्टीबद्दल आपले मत व्यक्त केल्यानंतर किंवा प्रश्न विचारल्यानंतर वापरला जातो. पण, हा वाक्यांश केवळ औपचारिकता नसून त्याच्या वापरामुळे तुमची इंग्रजी संवाद अधिक हळवी आणि मैत्रीपूर्ण बनते.
शब्दशा ह्या वाक्यांशचा अर्थ “तुझ्या बद्दल काय,तुमच्याबद्दल काय ?” असा होतो पण हा विविध परिस्थितींमध्ये वापरता येणारा वाक्प्रचार आहे. हा वाक्प्रचार संवादाला चालना देण्यासाठी, दुसर्याच्या अनुभवाबद्दल जाणून घेण्यासाठी वापरला जातो.याचा प्रयोग कशाबद्दलही करता येतो – वैयक्तिक अनुभव, कृती, तसेच मते आणि अंदाजांवरही.
चला तर मग या वाक्यांश चा सराव कसा करायचा आणि तो कुठे वापरायचा ते जाणून घेऊया म्हणजे तुम्हाला How about you meaning मराठी मध्ये समजेल
आपले मत व्यक्त केल्यानंतर: उदाहरणार्थ, “The movie was amazing!” असे म्हणाल्यानंतर, आपण पुढे “How about you? Did you enjoy it?” असे विचारू शकता.
प्रश्न विचारल्यानंतर: एखाद्या गोष्टीबद्दल माहिती विचारल्यानंतर, आपण “How about you? Have you ever tried that?” असे विचारून त्यांनाही आपले अनुभव सामायिक करण्याची संधी देऊ शकता.
आमंत्रण देऊन: मित्रांना भेटायला किंवा बाहेर जायला बोलावताना, आपण “Would you like to join me for coffee?” असे म्हणाल्यानंतर, “How about you? Are you free?” असे विचारून त्यांचे मत जाणून घेऊ शकता.
हे सुद्धा वाचा, How आणी What
मित्रांसोबत बोलताना: तुमच्या मित्रांसोबत इंग्रजीमध्ये बोलताना हा वाक्यांश नेहमी वापरा. तुमच्या मते आणि त्यांच्या मतांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी हे खूप चांगले आहे.
इंग्रजी चित्रपट आणि टीव्ही शो पाहताना: कधीही चित्रपट किंवा शो पाहात असताना, त्यात वापरलेला “How about you?” हा वाक्यांश लक्षात ठेवा आणि तुमच्या दैनंदिन संवादात वापरण्याचा प्रयत्न करा.
इंग्रजी संभाषणांचे नमुने वाचा: इंग्रजी संभाषणांचे नमुने वाचून त्यांमध्ये हा वाक्यांश कसा वापरला आहे ते पहा आणि त्यांच्यावरून प्रेरणा घ्या.
हे दोन्ही वाक्यांश सारखेच वाटत असले तरी त्यांच्यात काही सूक्ष्म फरक आहेत. पहिले आपण थोडक्यात फरक समजून घेऊयात
दोन्ही वाक्यांश सारख्याच परिस्थितीत वापरता येतात.
“How about you?” मध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या मताची, भावनांची किंवा इच्छेची चौकशी केली जाते.
“What about you?” मध्ये फक्त माहिती जाणून घेतली जाते.
मग आता वापर बगूयात:
सूक्ष्म फरक समजून घेऊ: