शब्दांचे अर्थ मराठी मध्ये जाणून घ्या

MBBS म्हणजे काय । MBBS Meaning in Marathi

mbbs meaning in marathi blog feature image
Table of Contents

मानव अनेक व्याधी आणि आजारांनी ग्रासलेले आहेत. अशा कित्येक लोकांची सेवा करून आणि 2 पैसै कमवून आपला उदरनिर्वाह करायचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्यांच्यासाठी वैद्यकिय क्षेत्रातील प्रतिष्ठित पदवी म्हणजे mbbs पदवी आहे. तुम्हाला जर mbbs म्हणजे काय होते हे जाणून घ्यायचे असेल तर त्याकरिता च आम्ही तुमच्यासाठी प्रस्तुत article घेऊन आलो आहोत. 

mbbs meaning in Marathi या article मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, mbbs चा मराठी मध्ये काय अर्थ होतो तसेच हा कोर्स करण्यासाठी पात्रता कागदपत्रे आणि त्यासोबतच प्रवेश परीक्षा बद्दल देखील संपूर्ण माहिती मराठी मध्ये सांगणार आहोत. तरी प्रस्तुत article तुम्ही अगदी शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती आहे.

MBBS Meaning in Marathi – mbbs चा मराठी मध्ये अर्थ

           mbbs ही एक वैद्यकिय क्षेत्रातील प्रतिष्ठित पदवी आहे. याचा full form Bachelor of Medicine and Bachelor Surgery असे आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये वैद्यकिय क्षेत्रात काम करण्यासाठी सज्ज केले जाते. म्हणजेच हा course केल्यानंतर संबंधित विद्यार्थी डॉक्टर किंवा सर्जन होऊ शकतो. हा संपूर्ण course 6 वर्षाचा असून यात 9 सेमीस्टर आणि 1 वर्षाची आंतरवासिका म्हणजेच Internship असते.

Entrance Test For mbbs course – mbbs कोर्स साठी प्रवेश परीक्षा

          ज्या विद्यार्थ्यांना mbbs course करायची इच्छा असेल त्यांना NEET म्हणजेच National Eligibility Entrance Test ही क्लिअर करणे गरजेचे असते. या exam शिवाय कुठलाही विद्यार्थी mbbs साठी पात्र ठरवला जात नाही. ही exam 720 गुणांची असून यात 180 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारलेले जातात. एक बरोबर उत्तरास 4 गुण दिले जातात तर एक चुकीच्या उत्तरास 1 गुण वजा केला जातो. म्हणजेच यामध्ये 1 गुणाची negative marking असते.

Eligibility for mbbs Course – mbbs कोर्स साठी पात्रता

  • भारतात एमबीबीएस अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना NEET परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. अनेक विद्यापीठे किंवा महाविद्यालये त्यांच्या स्वत: च्या प्रवेश परीक्षा घेतात, आवश्यक गुण प्राप्त केल्यानंतरच विद्यार्थी त्या महाविद्यालयात किंवा विद्यापीठात एमबीबीएस अभ्यासक्रम करू शकतात.
  • एमबीबीएससाठी, विद्यार्थ्याने PCB (Physics, Chemistry, Biology) मधून 12 वी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्याने त्याच्या/तिच्या निवडलेल्या विद्यापीठाने किंवा महाविद्यालयाने प्रवेशासाठी ठरविलेल्या किमान ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी SOP, LOR आणि CV/Resume सारखी कागदपत्रे देखील आवश्यक आहेत.
  • एमबीबीएस प्रवेशासाठी उमेदवारांचे किमान वय १७ वर्षे असावे. एमबीबीएस प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा २५ वर्षे आहे.
हे सुद्धा वाचा, BHMS Meaning in Marathi

Top 10 College for mbbs – mbbs करण्यासाठी टॉप 10 कॉलेज

  • ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेज, दिल्ली
  • पोस्टग्रेजुएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एजुकेशन एंड रिसर्च कॉलेज चंदिगढ
  • ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर
  • नेशनल इंस्टीट्यूट ऑफ मेंटल हेल्थ एंड न्यूरोसायन्स कॉलेज, बैंगलोर
  • संजय गांधी पोस्टग्रेजुएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेज, लखनऊ
  • अमृता विश्व विद्यापीठ, कोयंबटूर
  • बनारस हिंदू यूनिवर्सिटी, वाराणसी
  • जवाहरलाल इंस्टीट्यूट ऑफ पोस्टग्रेजुएट मेडिकल एजुकेशन एंड रिसर्च कॉलेज, पुदुचेरी
  • किंग जॉर्ज मेडिकल यूनिवर्सिटी, लखनऊ
  • कस्तूरबा मेडिकल कॉलेज, मणिपाल

वरील कॉलेजेस हे संपूर्ण भारतातील पहिल्या 10 क्रमांकावर येणारे कॉलेजेस आहेत.

Specialization for mbbs Course – mbbs कोर्स साठी Specialization

       mbbs मध्ये admission करते वेळी आपल्या नेमक्या कोणत्या विषयात जास्त रुची आहे हे बघून आपल्याला तो एक विशेष विषय घेणे गरजेचे आहेत त्याकरिता आम्ही तुम्हाला ते specialization विषय खालील प्रमाणे सांगत आहोत.

  • Ophthalmology (नेत्र रोग तज्ञ)
  • general medicine (सामान्य डॉक्टर)
  • bone disease (हाडांचा डॉक्टर)
  • general Surgery (सामान्य शस्त्रक्रिया)
  • anesthesiology (भूलशास्त्र)
  • Obstetrics and Gynecology (प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ञ)
  • psychiatry (मानसिक उपचार)
  • pediatrics (बालरोग तज्ञ)
  • dermatology (त्वचा रोग तज्ञ)
  • ENT (Ear, Nose and Throat) (कान, नाक, डोळ्यांचा तज्ञ)

वरील दिलेल्या विषयांमधून तुम्हाला ज्या विषयात सर्वात जास्त रुची आहे तो विषय तुम्हाला निवडावा लागतो.

Process of Apply for mbbs Course – mbbs कोर्स साठी अर्ज करण्याची प्रक्रिया

  • सर्व प्रथम तुम्हाला निवडलेल्या विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागते.
  • विद्यापीठाच्या वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला एक user name आणि Password मिळते.
  • त्यानंतर वेबसाइटवर Sign In केल्यानंतर तुम्हाला तुमचा निवडलेला कोर्स निवडावा लागतो.
  • त्यानंतर शैक्षणिक पात्रता तसेच विचारलेले संपूर्ण माहिती भरावी लागते.
  • यानंतर Submit बटणावर click करून संबंधित अर्जाची जी फिस असेल ती भरावी लागते.
  • जर प्रवेश परीक्षेवर आधारित असेल तर प्रथम प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी कररावी लागते आणि त्यानंतर निकाल आल्यानंतर समुपदेशनाची प्रतीक्षा करावी लागते. तुमची निवड प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाते आणि यादी जाहीर केली जाते.

Important Documents for mbbs Course Admission – mbbs कोर्स करीता दाखला घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • रीतसर भरलेला अर्जाचा फॉर्म 
  • प्रवेश परीक्षा आणि इंग्रजी प्रवीणता चाचणी स्कोअरकार्ड
  • आधार कार्ड किंवा कुठलाही ओळखपत्र.
  • तुमच्या डिप्लोमाच्या प्रती 
  • मागील शैक्षणिक पात्रतेचा रेकॉर्ड
  • आरोग्य सेवा क्षेत्राशी संबंधित स्वैच्छिक किंवा कामाच्या अनुभवाचा इतर पुरावा असल्यास तो सुद्धा तुम्ही देऊ शकता परंतु हे compulsary नाही.
  • परदेशात एमबीबीएस करण्याचा विचार करत असल्यास विद्यार्थी पासपोर्ट आणि व्हिसा
  • तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो

After mbbs Course – mbbs कोर्स नंतर

       एमबीबीएस अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी असतात. दोन मुख्य मार्ग आहेत, एकतर विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जाऊ शकतो किंवा नोकरी सुरू करू शकतो. एमबीबीएस पदवीधर त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करता येतील असे आणखी काही अभ्यासक्रम आम्ही खालील प्रमाणे सांगत आहोत ते तुम्ही mbbs नंतर करू शकता.

  • Master of Surgery (MS)
  • Doctorate of Medicine (MD)
  • Master of Business Administration (MBA) 
  • Master of Science (MSc)
  • PG Diploma 
  • Master of Chirurgiae (MCH)
  • Master of Dental Surgery (MDS)
  • PhD 

Jobs after mbbs Course – mbbs कोर्स नंतर नौकरी

      mbbs कोर्स केल्यानंतर गरजेचे नाही की तुम्ही नोकरी च करू शकता तर mbbs झाल्यानंतर तुम्हाला स्वतःचा हॉस्पिटल चालू करून यात प्रॅक्टिस करू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्हाला नौकरी च करायची असेल तर तुम्ही सरकारी किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये job Apply करून त्यात तुम्ही जॉब करू शकता.

Salary after mbbs Course – mbbs कोर्स नंतर वेतन

      mbbs केल्यानंतर तुमच्या कामावर आणि अनुभवावर वेतन ठरविला जातो. Mbbs नंतर जॉब करायला गेलं तर त्या व्यक्तीला त्याचा प्रारंभिक वेतन 1 लाख पर्यंत असतो परंतु जसा जसा त्याच्या अनुभव वाढत जातो तसा तसा त्याच्या वेतन देखील वाढत जातो आणि वेतन त्याला 25 लाखापर्यंत मिळत असतो.

Conclusion

                 तर मित्रांनो आम्ही तुम्हाला mbbs meaning in Marathi या Article च्या माध्यमातून mbbs चा मराठी मध्ये काय अर्थ होतो? तसेच प्रस्तुत कोर्स करण्यासाठी कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते? कागदपत्रे काय लागतात? जॉब कुठे करता येईल? व त्यांचा वेतन किती असेल? यासोबत mbbs केल्यानंतर पुढे आणखी काय काय शिक्षण घेता येईल या संबंधित संपूर्ण माहिती तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. वरील माहिती वाचून आमचा हा प्रस्तुत article तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला comment box च्या माध्यमातून नक्कीच कळवा तसेच प्रस्तुत article तुम्हाला आवडल्यास पुढे share करायला विसरू नका.

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

mbbs ही एक वैद्यकिय क्षेत्रातील प्रतिष्ठित पदवी आहे. याचा full form Bachelor of Medicine and Bachelor Surgery असे आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये वैद्यकिय क्षेत्रात काम करण्यासाठी सज्ज केले जाते. म्हणजेच हा course केल्यानंतर संबंधित विद्यार्थी डॉक्टर किंवा सर्जन होऊ शकतो.

हा संपूर्ण course 6 वर्षाचा असून यात 9 सेमीस्टर आणि 1 वर्षाची आंतरवासिका म्हणजेच Internship असते.

होय, ज्या विद्यार्थ्यांना mbbs course करायची इच्छा असेल त्यांना NEET म्हणजेच National Eligibility Entrance Test ही क्लिअर करणे गरजेचे असते. या exam शिवाय कुठलाही विद्यार्थी mbbs साठी पात्र ठरवला जात नाही. ही exam 720 गुणांची असून यात 180 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारलेले जातात. एक बरोबर उत्तरास 4 गुण दिले जातात तर एक चुकीच्या उत्तरास 1 गुण वजा केला जातो. म्हणजेच यामध्ये 1 गुणाची negative marking असते.