शब्दांचे अर्थ मराठी मध्ये जाणून घ्या

MIDC meaning in Marathi। Long Form, अर्थ, वैशिष्ट्य आणि महत्व

midc meaning in marathi blog feature image
Table of Contents

मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनात अनेक शब्द आपल्या कानी पडत असतात. त्यातले अधिकोत्तर शब्दांचे अर्थ आपल्याला मुळी माहितीच नसतात. त्यामुळे आपल्याकडे Google वर सर्च केल्याशिवाय पर्याय नसतो. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच एका शब्दाचा अर्थ माहिती करून द्यायला प्रस्तुत article लिहीत आहोत.

तुम्ही कंपनी, व्यवसाय असे अनेक शब्द ऐकले असतीलच परंतु या शब्दांबरोबरच आपल्याला MIDC हा शब्द नक्कीच ऐकायला मिळतो. आता MIDC म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न तुमच्या मनात साहजिकच पडला असेल! तर आम्ही तुम्हाला आजच्या MIDC meaning in Marathi या article च्या माध्यमातून MIDC बद्दल संपूर्ण माहिती तुमच्या आमच्या म्हणजे मराठी भाषेत सांगणार आहोत. तर article ला अर्ध्यात सोडून कुठेही जाऊ नका तर प्रस्तुत article अगदी शेवट पर्यंत वाचा ही नम्र विनंती. प्रस्तुत Article वाचून तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल.

 

Full Form of MIDC  – MIDC चे संक्षिप्त रूप

          MIDC चा अर्थ जाणून घेण्याआधी तुम्हाला MIDC चा full form म्हणजेच संक्षिप्त रूप माहिती असणे गरजेचे आहे. 

         MIDC चा Long Form ज्याला मराठी मध्ये संक्षिप्त रूप असे म्हणतात ते “Maharashtra Industrial Development Corporation” असे आहे ज्याला आपण मराठी मध्ये  “महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळ” असे म्हणतो.

 

Formation of MIDC in Marathi – MIDC ची स्थापना

        सन 1961 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम यासाठी एक कायदा तयार केला.28 फेब्रुवारी 1962 मध्ये राष्ट्रपती यांनी या कायद्यास मंजुरी दिली आणि 1 ऑगस्ट 1962 मध्ये MIDC ची स्थापना केली. त्यांनतर 1 मार्च 1965 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने MIDC चे राजपत्र प्रकाशित केले. MIDC चे मुख्यालय मुंबई येथील अंधेरी मध्ये “उद्योग सारथी कार्यालय” म्हणून आहे.

हे सुद्धा वाचा, BPO काय असत

MIDC meaning in Marathi – मराठी मध्ये MIDC या शब्दाचा अर्थ

तर मित्रांनो आता तुम्हाला MIDC चा long form आणि स्थापना कधी झाली हे तुम्हाला माहिती झालं आहे. आता आपण MIDC चा nemkaa अर्थ काय होतो हे जाणून घेऊया.

 MIDC म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ होय. हे एक औद्योगिक क्षेत्र आहे ज्यामध्ये अनेक लहान मोठ्या स्वरूपाच्या कंपन्या काम करतात आणि या कंपन्या वेग वेगळे उत्पादन करीत असतात. या कंपन्यांचा सर्वात मोठ्ठा फायदा असा आहे की, या कंपन्या लोकल असल्यामुळे यामध्ये अनेक लोकांना सहज रोजगार उपलब्ध होत असते.

 

List of MIDC in Maharashtra – महाराष्ट्रामधील MIDC ची यादी

              MIDC ची स्थापना 1962 साली झाली त्यावेळी ठाणे येथे वागळे इस्टेट MIDC झाली. हे पहिले औद्योगिक क्षेत्र मानले जाते. त्यांनतर हळू हळू MIDC कंपन्या संपूर्ण महाराष्ट्रभर पसरल्या त्या आपण खालील प्रमाणे पाहुया:


  • सातारा
  • सातारा MIDC
  • देगाव 5 स्टार MIDC 


  • सांगली
  • कुपवाड MIDC
  • मिरज MIDC
  • इस्लामपूर MIDC 


  • कोल्हापूर
  • कागल 5 स्टार MIDC
  • गोकुळ शिरगाव MIDC
  • शिरोली MIDC


  • पंचतारांकित MIDC नांदेड
  • MIDC लातूर
  • वाळूज MIDC औरंगाबाद (संभाजीनगर)
  • तारापूर बोईसर MIDC
  • TTC MIDC ठाणे, नवी मुंबई
  • पुणे 


  • नाशिक 
  • सातपूर MIDC
  • अंबड MIDC
  • सिन्नर MIDC
  • गोंदे MIDC


  • बुटीबोरी 5 स्टार MIDC नागपूर

 

Characteristics Of MIDC – MIDC ची वैशिष्ट्ये

           आता आपण MIDC ची वैशिष्टय खालील प्रमाणे समजून घेऊया:

  • MIDC चे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी A, B, C, D, D+, नक्षलग्रस्त क्षेत्र, विना उद्योग जिल्हे आणि आकांक्षा जिल्हे असे तालुका निहाय वर्गीकरण केलेले आहे.
  • MIDC चे काही पात्रता निकष ठरविलेले आहेत जे उद्योगाचे आकारमान, रोजगार, मालकी हक्क आणि उद्योगाचे क्षेत्र यावर अवलंबून आहेत.
  • महाराष्ट्र राज्याला जागतिक पुरवठा साखळीचा महत्वाचा भाग बनविणे हे MIDC चे महत्वाचे उद्दिष्ट आहे त्यासाठी MIDC अशा व्यवसायांना प्रोत्साहन देते जे जागतिक पुरवठा साखळी मध्ये येतात.
  • कार्यक्षमतेत सुधारणा करून लॉजिस्टिक्स खर्चात कपात करण्याचे काम MIDC योजनेतून केले जाते.
  • MIDC लॉजिस्टिक्स औद्योगिक समूह विकसित करण्याचे देखील काम करते.
  • पर्यावरणाला पूरक असे वाहतूक आणि राज्यात शास्वत विकास साधणे MIDC चे काम आहे.
  • इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे त्याकरिता प्रत्येक ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणे MIDC चे काम आहे.
  • MIDC योजनेमधून जागतिक दर्जाचे मनुष्यबळ निर्माण करीत असते.

वरील सर्व MIDC चे प्रमुख वैशिष्ट्य आहेत.

 

Important of MIDC – MIDC चे महत्व

              महाराष्ट्र राज्य सरकारने स्थापन केलेले MIDC हे असे एक महामंडळ आहे ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील लघु आणि सूक्ष्म उद्यागांना प्रोत्साहन दिले जाते आणि त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा पुरविल्या जातात. जसे की, जमीन, पाणी तिथे जाण्यासाठी आणि येण्यासाठी योग्य रस्ते आणि रात्री करीत पथदिवे त्यासोबतच उद्योग उभारण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज सुद्धा दिले जाते.

      यामुळे महाराष्ट्र राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन मिळत असते. आणि त्यासोबत राज्यातील लोकांना रोजगार सुद्धा मिळत असते त्यासाठी MIDC योजना आपल्या राज्यासाठी खूप उपयुक्त आहे.

 

Other Long Form of MIDC – MIDC चे इतर संक्षिप्त रूप

 

  • Modified Indian Driving Cycle (भारतीय ड्रायव्हिंग सायकल सुधारित)
  • Michigan Indigent Defense Commission (मिशिगन इंडिजेंट डिफेन्स कमिशन)
  • Maryland/Israel Development Center (मेरीलँड/इस्रायल डेव्हलपमेंट सेंटर)
  • Maryland Israel Development Center (मेरीलँड इस्रायल विकास केंद्र)
  • McPherson Industrial Development Company (मॅकफर्सन औद्योगिक विकास कंपनी)
  • McGill Infant Development Centre (मॅकगिल शिशु विकास केंद्र)
  • Medtronic India Development Centre (मेडट्रॉनिक इंडिया डेव्हलपमेंट सेंटर)
  • Metro Infectious Disease Consultants (मेट्रो संसर्गजन्य रोग सल्लागार)
  • McPherson Industrial Development Company (मॅकफर्सन औद्योगिक विकास कंपनी)
  • Minimally Invasive Diagnostic Center (मिनिमली इनवेसिव्ह डायग्नोस्टिक सेंटर)
  • Massachusetts Interior Design Coalition (मॅसॅच्युसेट्स इंटिरियर डिझाइन कोलिशन)
  • Measurement and Instrumentation Data Center (मापन आणि इन्स्ट्रुमेंटेशन डेटा सेंटर)
  • Marin Interagency Disaster Coalition (मरिन इंटरएजन्सी डिझास्टर कोलिशन)
  • Michigan Interagency Dispatch Center (मिशिगन इंटरएजन्सी डिस्पॅच सेंटर)
  • Multimedia Instructional Development Center (मल्टीमीडिया निर्देश विकास केंद्र)

 

FAQ’s

  1. What is the Long Form Of MIDC? – MIDC चे संक्षिप्त रूप काय आहे?

        MIDC चा Long Form ज्याला मराठी मध्ये संक्षिप्त रूप असे म्हणतात ते “Maharashtra Industrial Development Corporation” असे आहे ज्याला आपण मराठी मध्ये  “महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळ” असे म्हणतो.

 

  1. What is the meaning of MIDC? – MIDC म्हणजे काय आहे?

       MIDC म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ होय. हे एक औद्योगिक क्षेत्र आहे ज्यामध्ये अनेक लहान मोठ्या स्वरूपाच्या कंपन्या काम करतात आणि या कंपन्या वेग वेगळे उत्पादन करीत असतात. या कंपन्यांचा सर्वात मोठ्ठा फायदा असा आहे की, या कंपन्या लोकल असल्यामुळे यामध्ये अनेक लोकांना सहज रोजगार उपलब्ध होत असते.        

 

  1. What is Important of MIDC? – MIDC चे महत्व काय आहे?

            महाराष्ट्र राज्य सरकारने स्थापन केलेले MIDC हे असे एक महामंडळ आहे ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील लघु आणि सूक्ष्म उद्यागांना प्रोत्साहन दिले जाते आणि त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा पुरविल्या जातात. जसे की, जमीन, पाणी तिथे जाण्यासाठी आणि येण्यासाठी योग्य रस्ते आणि रात्री करीत पथदिवे त्यासोबतच उद्योग उभारण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज सुद्धा दिले जाते.

      यामुळे महाराष्ट्र राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन मिळत असते. आणि त्यासोबत राज्यातील लोकांना रोजगार सुद्धा मिळत असते त्यासाठी MIDC योजना आपल्या राज्यासाठी खूप उपयुक्त आहे.

Conclusion

                तर मित्रांनो आम्ही तुम्हाला MIDC meaning in Marathi या article च्या माध्यमातून MIDC चा long form, त्याचा अर्थ, त्याचे वैशिष्ट्य, त्याचे महत्व आणि सोबतच MIDC चे इतर long form सुद्धा सांगितलेले आहेत. आम्ही दिलेली माहिती वाचून तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला Comment Box च्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि जर तुम्हाला आमचा प्रस्तुत article आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना share करायला विसरू नका. प्रस्तुत article वाचून तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडला असेल अशी आम्ही आशा बाळगतो.