नमस्कार मित्रांनो, तुमचं आम्ही आमच्या या website वर मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो तुम्ही Obsessed हा शब्द facebook.com, Instagram.com अशा अनेक social site’s वर वाचला असणार किंवा तुमच्या मित्र मैत्रिणींकडून ऐकले असाल परंतू तुम्हाला याचा अर्थ माहिती नसेल. तुम्ही या शब्दाचा अर्थ google.com वर देखील search केले असणार परंतु तुम्हाला त्यामध्ये देखील हवा तेवढा response मिळाला नसेल तर मुळीच काळजी करू नका. आम्ही आज तुमच्यासाठी Obsessed Meaning In Marathi या article मध्ये Obsessed या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ काय होतो हे सांगणार आहोत त्यासोबतच या शब्दाच्या defination देखील उद्दाहरणासहीत समजावून सांगणार आहोत. तरी आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो की, प्रस्तुत Article तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की वाचा ज्यामुळे तुमच्या शब्दकोशात आणखी एका शब्दाची भर पडेल.
तर मित्रांनो, अब्सेस्ड या शब्दाची सर्वप्रथम आपण English मध्ये defination पाहुया त्यानंतर त्याची मराठी मध्ये defination पाहुया.
English:- When a person unable to stop thinking intrested or in worried about something then this situation is called as “Obsessed”.
Marathi:- जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल फार चिंतित असते किंवा ती गोष्ट त्याला खूप आवडते त्या गोष्टीबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही तेव्हा त्या परिस्थितीला “अब्सेस्ड” असे म्हणतात.
बाकी इंग्रजी मधले कठीण शब्द सुद्धा बघा
Obsessed Meaning In Marathi – अब्सेस्ड चा मराठी मध्ये अर्थ
आपल्या आयुष्यात आपण कित्येकदा एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणा किंवा एखाद्या गोष्टीबद्दल फार आकर्षित होऊन जातो. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला ती व्यक्ती किंवा एखादी गोष्ट फार आवडू लागते किंवा आपण त्या व्यक्ती वा गोष्टीबद्दल चिंता करत राहतो. आवडणे, मोहित होणे किंवा चिंता करणे हे तर सामान्य आहे परंतु जेव्हा आपण त्या गोष्टीबद्दल वा व्यक्तीबद्दल आपली आवड किंवा चिंता जास्तच करू लागतो किंवा आपण आपली चिंता करायची किंवा आवडायची सीमा पार करतो त्या परिस्थितीला दर्शविण्यासाठी अब्सेस्ड या शब्दाचा वापर केला जातो. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखादया व्यक्तीबद्दल वेड लागणे असा त्या शब्दाचा सर्वसाधारणपणे अर्थ होतो.
आता आपण Obsessed हा शब्द नेमका केव्हा वापरला जातो त्यासाठी काही उदाहरणे पाहुया ज्यामुळे तुमच्या मनात असलेल्या या शब्दाबद्दलच्या सगळ्या शंका कुशंका नाहीशा होतील.
उदाहरणार्थ पाहुया की, एखादी मुलगी तिच्या मित्राच्या प्रेमात वेडी झालीय तर अशा परिस्थितीत आपण म्हणू शकतो की, she is Obsessed with her friend in Love म्हणजेच तिच्या मित्राच्या प्रेमामध्ये वेडी झालीय.
तुम्ही Bollywood मधील news बघत असणार तर एक गोष्ट तुमच्या वाचण्यात नेहमीच येत असेल ती म्हणजे सलमान खान हा ऐश्वर्या च्या सुंदरतेमुळे वेडा झालाय तर अशा वेळी सुद्धा आपण म्हणू शकतो की, “Salman Khan Obsessed with Aishwarya’s beauty”
एखादा विद्यार्थी नेहमीच त्या परीक्षेमुळे चिंता करत असेल तर अशा वेळी आपण म्हणू शकतो की, A Student Obsessed with worried about his exam’s म्हणजेच एक विद्यार्थी परीक्षेच्या चिंतेने वेडा झालाय.
वरील व्याख्या, अर्थ आणि उदाहरणांवरून तुम्हाला अब्सेस्ड या शब्दा बद्दल तर समजला असेलच तर आता आपण या शब्दाचे समानार्थी शब्द पाहुयात.
वरील व्याख्या, अर्थ आणि उदाहरणांवरून तुम्हाला अब्सेस्ड या शब्दा बद्दल तर समजला असेलच तर आता आपण या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द पाहुयात.