नमस्कार मित्रांनो, आपण इथे simple present tense meaning in marathi शिकायला आला असेल तर तुम्हाला इंग्रजी शिकायच आहे, ते पण मराठी मध्ये हे निश्चित आहे, तर मग आपण या लेखा मध्ये simple present tense चा अर्थ मराठी मध्ये काय असतो आणी आपण simple present tense चे मराठी वाक्य इंग्रजी मध्ये कशे बोलू शकतो ते बगूयात
आपल्याला जर इंग्रजी बोलायला शिकायचे असेल तर आपण फक्त १२ काळ तरी पूर्णपणे समजले आणी त्यांचा सराव केला तर तुम्ही हमखास इंग्रजी बोलू शकतात, चला तर मग आपण त्या बारा काळ मधला एक काळ म्हणजेच simple present tense शिकूया
मी तुम्हाला या लेखा मध्ये simple present tense बद्दल ३ points सांगणार आहे त्याच्याने तुम्ही simple present tense चे मराठी वाक्य इंग्रजी मध्ये सराव केल्याने सहज बोलू शकतात. simple present tense म्हणजे काय असत, आणी ते इंग्रजी बोलताना कशे वापरायचे आणि त्याचे उदाहरण सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो simple present tense इंग्रजी समजन्यासाठी आणि बोलण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा ही विनंती करतो चला तर मग सुरु करूयात.चला तर मग आता पहिला point बगूयात
मित्रांनो जेव्हा वाक्याच्या क्रियापदाच्या(verb) शेवटी ते, तो ,त ,ता ,तं, तोस, तेस हे अक्षर राहिल्यास ते वाक्य simple present tense चे आहे असं म्हणू शकतो.
उदाहरण.
१. राहुल खेळतो – Rahul plays
२. तुला वाटतं – You think
वरील मराठी चे वाक्य इंग्रजी मध्ये करताना मीने पुढची रचना वापरली
कर्ता + क्रियापदाचे पहिले रूप (s)
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की क्रियापदाचे रूप म्हणजे काय, क्रियापद काय असते आणी “s” हे letterका लागले (s लावण्याचे काही नियम असतात ते आपण पुढे बगूयात)
तर क्रियापद म्हणजे नावातच अर्थ आहे “क्रिया”, जसे वरील उदाहरणा मध्ये खेळतो, वाटतं ही क्रिया झाली. आणी क्रियापदाचे चार रूप असतात त्याला आपण क्रियापदाचे पहिले रूप, क्रियापदाचे दुसरे रूप, क्रियापदाचे तिसरे रूप आणि क्रियापदाचे चौथे रूप.
आता वरील उदाहरणा मध्ये खेळतो म्हणजेच play आणी वाटतं म्हणजेच think, चला तर मग आपण खालील तक्त्या मध्ये ह्या शब्दाचे चारी रूप बगूयात
क्रियापदाचे पहिले रूप | क्रियापदाचे दुसरे रूप | क्रियापदाचे तिसरे रूप | क्रियापदाचे चौथे रूप |
Play | Played | Played | Playing |
Think | Thought | Thought | Thinking |
क्रियापदाचे दुसरे रूप आणी तिसरे रूप तुम्हाला पाठ करावे लागणार आणी चौथे रूप खूप सोपे असते, जसे की play आणी think ला फक्त ing लावायचे म्हणजेच वरील उदाहरणा मध्ये play आणी think चे चौथे रूप हे playing आणी Thinking होणार.
मित्रांनो क्रियापदाचे रूप १२ काळ मध्ये वेगवेगळे असते जस कीं आपण बघितले की simple present tense मध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरले आहे.
मित्रांनो तुम्हाला इथे क्रियापद आणी त्याचे चारी रूप बगायला मिळतील म्हणजे तुम्ही क्रियापदाचे रूप वाक्या मध्ये वापरू शकतात आणी न चुकता simple present tense चे मराठी वाक्य इंग्रजी मध्ये बोलू शकतात.
पुढे आपण simple present tense चा अर्थ काय असतो तो बगूयात म्हणजे तुम्हाला हा काळ चा concept चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल.
Simple Present Tense ला मराठी मध्ये साधा वर्तमान काळ असे म्हणतात, म्हणजेच जेव्हा एखादी क्रिया पुन्हा पुन्हा होते,एखादे नैसर्गिक सत्य असेल किंव्हा वर्तमानातील सवय असेल ते व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरला जातो.
खाली मी काही उदाहरणे देतो मग त्याच्या द्वारे आपण वरती दिलेली व्याख्या समजूयात
आता वरील वाक्या मध्ये दररोज जाण्याची किंव्हा काम करण्याची सवय आहे आणी ती पुन्हा पुन्हा होत आहे. तसेच सूर्य पूर्वेस उगवतो हे नैसर्गिक सत्य आहे.
पुढे आपण बगूयात की इंग्रजी बोलताना साध्या वर्तमानाचे वाक्य इंग्रजी मध्ये कशे बनवायचे
आपण आता पर्यंत साधा वर्तमान काळ कशे असतात आणी काय असतात ते पाहिले, आता आपण त्यांचे इंग्रजीत रूपांतर कसे करायचे ते बगूयात
मराठी मध्ये असलेले साध्या वर्तमान काळाचे वाक्य इंग्रजी मध्ये बाणवण्या साठी आपल्याला वाक्याची रचना माहीत असणे आवश्यक आहे आणि ती आपण वरती बगितलेली आहे जसे की कर्ता + क्रियापदाचे पहिले रूप (s)
चला तर मग आपण आता काही साधे वर्तमान मधले मराठी वाक्य बगूयात आणी त्यांचे इंग्रजी रूपांतर करूयात
1. तू खोटे बोलतो
आता ह्या वाक्य मध्ये कर्ता आहे “तू” आणि क्रिया आहे “खोटे बोलणे”. “तू” ह्या कर्त्याला इंग्रजी मध्ये म्हणतात “You” आणी खोटे बोलण्याला इंग्रजी मध्ये म्हणतात “lie” म्हणून त्याचे इंग्रजी वाक्य होईल “you lie”. आता तुम्ही म्हणणार की क्रिया ला “s” का नाही लागला, तर ते आपण पुढे नियमामध्ये बगूयात.
2. मी कॉलेज ला सायकलने जातो
आता ह्या वाक्य मध्ये कर्ता आहे “मी” आणि क्रिया आहे “जातो “, ने ला इंग्रजी मध्ये म्हणतात “By”. By हे शब्दयोगी अव्यय आहे त्याला इंग्रजी मध्ये preposition असे म्हणतात. मग आता याचे इंग्रजी वाक्य होईल “I go to college by cycle”.
3. काही प्राणी रात्री शिकार करतात.
आता ह्या वाक्य मध्ये कर्ता आहे “प्राणी (Animal)” आणि क्रिया आहे “शिकार करणे (hunt)”. काही ला इंग्रजी मध्ये “some” आणी रात्री ला “night ” असे म्हणतात. म्हणून वाक्य होईल “Some animals hunt at night”. तर ह्या इंग्रजी वाक्या मध्ये at हे वापरले, कारण ते एक ठरावीक स्थान किंवा वेळ दाखवते, म्हणजेच या वाक्या मध्ये रात्र ही वेळ दाखवली आहे म्हणून night च्या अगोदर at हे वापरले आहे.
4. क्लास सात वाजता संपतो.
आता ह्या वाक्य मध्ये कर्ता आहे “क्लास” आणि क्रिया आहे “संपणे (finish)”. म्हणून इंग्रजी वाक्य होईल “The class finishes at 7”.इथे at हे वापरले आहे कारण क्लास एका वेळेला संपतो म्हणजेच 7 ला म्हणून 7 च्या अगोदर at वापरले आहे.आता finish च्या पुढे “es” का लागला ते आपण पुढे बगूयात.
मित्रांनो, जेव्हा आपण साध्या वर्तमानाचे मराठी वाक्य इंग्रजी मध्ये करतो तेव्हा काही नियम असतात ते आपल्याला त्याचे पालन करावे लागते म्हणजे इंग्रजी वाक्य बरोबर येते. तुम्ही म्हणतअसाल की एवढे नियम आणी रचना लक्षात ठेवल्या नंतर इंग्रजी वाक्य बनते आणी बनवताना खूप वेळ लागेल, पण मित्रांनो जर आपण याचा सराव केला तर तुम्हाला याचे वाक्य इंग्रजी मध्ये सहज बनवता पण येईल आणी बोलता सुद्धा,चला तर मग आपण पहिला नियम बगूयात.
जर कर्ता एकवचनी असेल तर त्याला “s” लावतात आणी अनेकवचनी असेल तर त्याला “s” लावत नाही
उदा.
उदा.
उदा.
पण जर “y” च्या आधी स्वर राहील्यास y चे i होत नाही तर फक्त s लागतो.
उदा.
इंग्रजी मध्ये ५ स्वर असतात ते म्हणजे a ,e, i, o, u .
मित्रांनो आपण खाली simple present tense चे काही उदाहरणे मराठी आणि त्याचे रूपांतर इंग्रजी मध्ये केले आहे. आपण याच्या मध्ये वरती सांगितल्या प्रमाणे मराठी चे वाक्य इंग्रजी मध्ये करण्यासाठी “कर्ता + क्रियापदाचे पहिले रूप (s)” साध्या वर्तमानाची रचना वापरली आहे
तुम्हाला video द्वारे माहीती घेयची असेल तर खाली आपण simple present tense meaning in marathi मध्ये video द्वारे सांगितला आहे.