नमस्कार मित्रांनो, आयुष्य सुंदर बनविण्यासाठी रोज नवनवीन विचार वाचत राहावे असं म्हणतात त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी आज suvichar in marathi with meaning या article मध्ये घेऊन आलो आहोत मराठीतील सुविचार आणि त्यांचे अर्थ जे वाचून तुमचं ही आयुष्य खूप सुंदर होईल आणि सोबतच तुमच्या ज्ञानात नव नवीन विचारांची भर पडेल.
1. माणसाला त्याच्या वाटेला आलेल्या संकटांना टाळता येत नाही परंतु, त्या संकटांशी दोन हाथ करण्यायोग्य त्याच्यामध्ये नक्कीच बळ असते.
अर्थ:- माणूस म्हटलं कि संकटं आलीच कारण या जगात एकही माणूस असा सापडणार नाही की ज्याच्यावर आजपर्यंत एकही संकटं आलेली नाही. या संकटांना माणसाला टाळता येत नाही आणि माणूस टाळू ही शकत नाही परंतु त्या संकटांना कसं सामोरं जायला पाहिजे किंवा आलेल्या संकटांशी कसं लढायचं आहे याचं बळ मात्र त्याच्यात नक्कीच असते. फक्त त्या माणसाला संकटं आलीत म्हणून रडत बसण्यापेक्षा लढण्यासाठी तत्पर राहायला हवं.
2. स्वतःची तुलना इतरांशी कधीच करू नये कारण, जे इतर करू शकतात ते जरी तुम्ही करू शकत नसले तरी देखील जे तुम्ही करू शकता ते इतर ही करू शकत नाही.
अर्थ:- कित्येकदा आपण आपली तुलना इतरांशी करत राहतो कारण आपल्याला कायम असच वाटत असते की, जे तो करू शकतो ते मी करू शकत नाही. हे खरं जरी असलं तरी देखील आपण हे अक्षरशा विसरतो की, जे मी करू शकतो ते इतर कुणीही करू शकत नाही. कारण या जगात प्रत्येक व्यक्ती मध्ये काहीतरी सुप्त गुण असतात त्यांना फक्त तुम्हाला ओळखायचं आहे. म्हणून स्वतःची तुलना इतरांशी मुळीच करू नका.
3. तुम्हाला निस्वार्थ प्रेमाची खरी व्याख्या समजून घ्यायची असेल तर, एकदा तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यात झाकून बघा.
अर्थ:- निस्वार्थ प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न करता निखळ पाण्यासारखं प्रेम करणे असते. आणि असे प्रेम जगात केवळ केवळ आई वडील च असतात त्यामुळे जर तुम्हाला निस्वार्थ प्रेमाची व्याख्या समजून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या डोक्यात झाकून बघा. तुम्हाला नक्कीच निस्वार्थ प्रेमाची व्याख्या काय आहे ते समजेल याची शाश्वती मी तुम्हाला देतोय.
4. जगातील सर्वात सुंदर आणि मोठ्ठं देवस्थान म्हणजे आई वडिलांचे चरण आहेत.
अर्थ:- ज्यांच्यामुळे तुमचं जन्म झालं, ज्यांच्यामुळे तुम्ही हे जग पाहिलं तेच खरे तुमचे सर्वात मोठे देव आहेत. आणि त्यांचे चरण म्हणजे त्यांचे पाय हेच तुमचे सर्वात मोठे देवस्थान आहेत. कारण आई वडील आहेत म्हणून तुम्ही आहात. कधीतरी विचारा जाऊन त्या मुलांना ज्यांचे आई वडील नाहीत. तेव्हा तुम्हाला त्या आई वडिलांची किंमत कळेल.
5. खोटं बोलण्यानं कुणाचं चांगलं होत असेल तर खोटं बोलणं चुकीचं नाही.
अर्थ:- खोटं बोलणं हे चुकीचं आहे परंतु कित्येकदा तरी आपल्या एक खोटं बोलण्याने कुणाचं तरी आयुष्य सुखमय होऊन जातं आणि आपल्या खोटं बोलण्याने कुणाचं चांगलं होत असेल तर हे मुळीच खोटं नसतं.
6. ज्याला खळखळून हसता येत नाही आणि धाय मोकलून रडता येत नाही त्याला आयुष्य जगता येत नाही.
अर्थ:- रडणं आणि हसणं ह्या भावना आहेत आणि ह्या भावना मनात कोंडून ठेवलं तर आयुष्यभर आपण खुश राहू शकत नाही त्यामुळे कधी आनंद झालं तर खळखळून हसायला पाहिजे आणि कधी दुःख झालं तर ते देखील मनातल्या मनात कोंडून ठेवण्यापेक्षा रडून बाहेर काढून घ्यावं कारण ते दुःख मनातल्या मनात राहतील तर तुम्हाला त्याचा आणखी जास्त त्रास होईल म्हणून दुःख झालं तर धाय मोकलून रडायला पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने आयुष्य जगू शकतो.
7. आयुष्यात सर्वांना दुखावलं तरी हरकत नाही पण कधीच आई वडिलांना दुखवू नका कारण तुमच्या साठी त्यांनी आधीच कित्येक दुःख सहन केलेले आहेत आणि आयुष्यभर सहन करतात.
अर्थ:- खरं तर कुणालाही दुखावणं हे पाप असते परंतु जे आई वडील कित्येक हालअपेष्टा सहन करून तुम्हाला जन्म देतात, तुमचं आयुष्यभर पालन पोषण करतात, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात त्या आई वडिलांना दुखावणं सर्वात मोठं महापाप आहे त्यामुळे प्रसंगी अशी वेळ आली तर भले तुम्ही इतरांना दुखवा परंतु आई वडिलांना दुखवू नका.
8. पुस्तक वाचणं हे महत्वाचं नाही तर ते समजून ही घेता आलं पाहिजे.
अर्थ:- आपण नेहमी म्हणतो की, पुस्तक वाचणं हे खूप चांगलं असतं परंतु खऱ्या अर्थाने बघितलं तर पुस्तक वाचणं हे महत्वाचं नाही आहे तर आपण ती पुस्तक किती समजून घेतो आणि त्यातले विचार किती आत्मसात करतो यावर अवलंबून असतं म्हणून पुस्तकं भरपूर वाचा पण नुसतं वाचून उपयोग नाही तर त्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय हे समजून घेत चला तर त्या पुस्तकांचा काही अर्थ लागेल.
9. दुसऱ्याचं दुःख समजून घ्यायचं असेल ना तर स्वतःला त्याच्या जागी ठेवा आणि मग विचार करा.
अर्थ:- आपल्याला दुसऱ्याचं दुःख तो पर्यंत समजून घेता येणार नाही जो पर्यंत आपण स्वतःला त्याच्या जागी ठेवून बघत नाही. कारण ते म्हणतात ना ज्याचं जळतं त्यालाच कळतं. म्हणून आपण ज्याला दुःख आहे त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघत नाही पर्यंत आपल्याला त्यांचं दुःख आयुष्यभर समजू शकणार नाही म्हणून त्यांचं दुःख समजून घ्यायचं असेल तर स्वतःला त्याच्या जागी ठेवावं लागतं.
10. वचन पाळता येत नसेल तर कुणाला वचन देऊ सुद्धा नका.
अर्थ:- कित्येकदा तरी आपण कुणालाही जे आपल्याला जमत नाही ते सुद्धा करायचं वचन देऊन टाकतो आणि त्यामुळे समोरचा व्यक्ती तुमच्यावर खूप अपेक्षा ठेवत असते. आणि मग आपण ते वचन पूर्ण केलं नाही तर त्याच्या अपेक्षा भंग होतात आणि त्याला फार दुःख होतं त्यामुळे कधीच कुणाला असं वचन देत जाऊ नका जे मुळातच आपण कधी पूर्ण करू शकत नाही.
11. खरं बोलून एकटे राहिलात तर हरकत नाही पण कुणी दूर जाईल या भीतीने खोटं बोलू नका.
अर्थ:- कधी कधी आपण एखाद्या खूप जवळच्या व्यक्ती जवळ खरं बोलून टाकतो आणि याचा त्याला राग आला की ती व्यक्ती सोडून जाते. त्यामुळे तुम्ही खूप दुखी होता परंतू खरं जर पाहिलं तर अशी व्यक्ती कधी तुमची न्हवतीच तर ती व्यक्ती काहीतरी स्वार्था पोटी तुमच्यासोबत होती आणि तुम्ही खरे बोलल्यामुळे त्यांचा स्वार्थ अपुरा राहतो त्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाते. त्यामुळे अशा स्वार्थापायी जवळ येणाऱ्या व्यक्ती सोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे केव्हाही चांगले असते. म्हणून खोटं बोलून अशी खोटी माणसे जवळ ठेवण्यापेक्षा खरं बोलून खऱ्या माणसांसोबत रहा किंवा एकटेच रहा.
12. कुणाकडूनही अपेक्षा ठेवू नका कारण अपेक्षा भंग झाल्या तर फार दुःख होतं.
अर्थ:- खूप वेळा आपण दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवत असतो आणि त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण नाही केल्या की आपल्याला दुःख होत असतं त्यामुळे कुणाकडून अपेक्षा ठेवलंच नाही तर आपल्याला दुःख कधीच होणार नाही म्हणून कुणाकडूनही अपेक्षा ठेवू नका.
13. आनंद कधीच दुसऱ्याला मागून किंवा दुसऱ्याकडून घेऊन मिळत नसते तर आनंद हा दुसऱ्यांना देऊन मिळत असते.
अर्थ:- आपण जेव्हा दुसऱ्यांना आनंद देतो तर त्यांच्या आणांदामुळे आपल्याला आनंद मिळत नाही ते कुणालाही मागून किंवा घेऊन मिळत नाही
14. तुमच्यावर कुणी हसत असेल तर दुखी होऊ नका तर आनंदित व्हा कारण तुमच्यामुळे कुणाच्यातरी रडणाऱ्या चेहऱ्यावर हास्य येतं.
अर्थ:- आपल्यावर कुणीतरी हसतं म्हणून आपण दुखी होतो परंतु त्या कारणाने का होईना पण कित्येक लोकं तुमच्यामुळे हसतात त्यामुळे दुखी होऊ नका तर तुम्ही दुसऱ्यांना हसवू शकता हे स्वतःला सांगून खुश रहा.
15. ज्ञान आणि पैसा या एकमेकांवर एवढ्या अवलंबून आहेत की, ज्ञानाशिवाय पैसा काहीच कामाचा नाही आणि पैशाशिवाय ज्ञान हा काहीच कामाचा नाही.
अर्थ:- माणसाकडे ज्ञान असेल आणि पैशे नसतील तर ती व्यक्ती केवळ ज्ञानाच्या भरोशावर काहीच करू शकत नाही आणि माणसाकडे पैसे असतील आणि ज्ञान नसेल तर ती व्यक्ती पैशाचा योग्य उपयोग करू शकणार नाही.
16. पैसा एवढाच कमवा की ज्याने तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या गरजा भागू शकतील कारण पैसा सर्वस्व नाही.
अर्थ:- पैशाने केवळ आपल्या गरजा पूर्ण होऊ शकतात परंतू वेळ प्रसंगी गरज आपल्याला जवळच्या माणसांची च पडत असते. त्यामुळे पैशे तेवढेच कमवा की, ज्याने तुमच्या गरजा पूर्ण होतील. बाकी जास्तीत जास्त माणसे कमवा जे तुम्हाला नेहमी साथ देतील.
17. तुमच्या बंद झालेल्या आयुष्याचे दार खऱ्या अर्थाने उघडायचे असेल तर त्याची एकच चाबी आहे ती म्हणजे मेहनत/परिश्रम/कष्ट
अर्थ:- कष्ट/परिश्रम/मेहनत याशिवाय पर्याय नसते त्यामुळे तुमचे आयुष्य सुखी आणि समाधानी करायचं असेल तर भरपूर कष्ट करा.
18. लोकांनी तुम्हाला वेडं ठरवलं तरी हरकत नाही पण यशाचं शिखर गाठण्यासाठी प्रयत्न करणं सोडू नका.
अर्थ:- तुम्हाला सतत अपयश येत असेल तर लोकं तुमच्यावर हसतील मात्र तुम्ही त्यांना दुर्लक्षित करून निरंतर प्रयत्न करत रहा एकदिवस तेच लोकं तुम्हाला वाकून नमस्कार करतील.
19. आयुष्यात अपयश आलं म्हणून कधीच खचून जाऊन नका कारण, यशाचं शिखर गाठतांना अपयश नावाचं दगड पार करावंच लागतं.
अर्थ:- यश मिळविण्यासाठी कित्येकदा आपल्याला अपयश मिळत असते परंतु त्या अपयशाला घाबरून तुम्ही थांबले तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही त्यामुळे तुम्ही खचून न जाता प्रयत्न करत रहा एकदिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल यात काडी मात्र शंका नाही.
20. वेळेची किंमत केली नाही तर वेळ तुमची किंमत करणार नाही.
अर्थ:- वेळ ही अनमोल असते असं म्हणतात त्याचं कारण असं आहे की, वेळेला कुणीही थांबू शकत नाही त्यामुळे तुम्ही वेळेची किंमत करा कारण एकदा गेलेली वेळ पुन्हा कधी येत नाही. त्यामुळे वेळेची किंमत कराल तर जगात तुमची किंमत करतील.
तर मित्रांनो आम्ही तुम्हाला suvichar in marathi with meaning या article माध्यमातून मराठी मध्ये सुविचार आणि त्यांचे अर्थ सांगितलो आहोत. हे सुविचार वाचून तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल अशी आशा बाळगतो. हा प्रस्तुत article तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला comment box मध्ये नक्कीच कळवा आणि आवडल्यास तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना नक्कीच पाठवा.